रत्नागिरीत दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

454

रत्नागिरीत एका दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सानिका सोनार असे मृत मुलीचे नाव असून तिने आत्महत्या का केली हे अद्याप कळालेले नाही.

रत्नागिरीच्या मालगुंड भागार राहणारी सानिका सोनार ही नुकतीच 10 वीत 70 टक्के गुण मिळवून पास झाली होती. मंगळवारी सानिकाचे पालक देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. तेव्हा सानिकाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या