
सामना प्रतिनिधी । पालघर
खार्डी- सफाळे व्हाया माकूणसार बसला आज सकाळी ७ वाजता माकूणसार येथे अपघात झाला. बस मागे घेत असताना बस चालकाकडून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीवर धडकली. मात्र सुदैवानं या घटनेत कुणी जखमी झाले नाही.
माकूणसार येथील सार्वजनिक विहिरीवर नेहमीच मोठ्या संख्येने गावातील महिला कपडे धूत असतात. याच भागात बस चालक गाडी मागे घेत होता. त्यावेळी अनवधानानं बस विहरीला धडकली. परंतु आज सुदैवाने या विहरीवर काम करण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या कमी असल्याने कोणीही जखमी झाले नाही. विहिरीवर असलेल्या महिलांनीच बस चालकाने धडक बसल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर बस चालकाने बस थांबवली. सुदैवाने बस विहिरीत न गेल्याने मोठी हानी टळली.
Summary: ST bus accident at makunsar





























































