
दिवाळीच्या सुट्टीत गावी तसेच इतरत्र फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना गुरुवारी एसटी महामंडळाच्या आरक्षण प्रणालीतील तांत्रिक घोळाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तिकीट बुकिंगचे नवीन सॉफ्टवेअर सोयीचे ठरण्याआधी अधिक गैरसोयीचे ठरत आहे. त्यावर ठोस तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला सपशेल अपयश आले आहे, अशी प्रतिक्रिया देत राज्यभरातील अनेक प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या रामभरोसे कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दिवाळीच्या सुट्टीत अनेकजण पुटुंबीयांसोबत बाहेर फिरण्याचा बेत आखत आहेत. त्यादृष्टीने एसटीच्या प्रवासाचे नियोजन केले जात असताना गुरुवारी राज्यभरातील हजारो प्रवाशांना आरक्षण प्रणालीतील तांत्रिक घोळाचा फटका बसला.