आता ‘पेटीएम’वरही मिळणार एसटीचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मोबाईल वॉलेट ऍप ‘पेटीएम’वर आता विमान आणि रेल्वेच्या तिकिटांप्रमाणेच एसटीच्या तिकिटांचेदेखील ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. ‘पेटीएम’ने त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी करार केला आहे. ‘पेटीएम’ या ऑनलाइन पेमेंट कंपनीने प्रवाशांना एसटीच्या तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण करणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी (एमएसआरटीसी) करार केला आहे. या करारामुळे प्रवासी पेटीएम ऍप आणि वेबसाइटवरून आता एसटीच्या वातानुकूलित शिवनेरी, शिवशाही, शिवशाही स्लीपर, सेमी लक्झरी, डे ऑर्डिनरी, नाइट एक्स्प्रेस, ऑर्डिनरी एक्स्प्रेस आदी श्रेणींच्या बसेसचे तिकीट आगाऊ आरक्षित करीत प्रवासाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्राबरोबर ‘पेटीएम’ने आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, तामीळनाडूतील परिवहन महामंडळांबरोबर करार केला आहे.