एसटीच्या ताफ्यात लवकरच दोनशे ई-बस

537

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ताफ्यातही ई-बसेस दाखल होणार आहेत. एसटी प्रशासनाकडून दोनशे ई-बसेससाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच या बसेस ताफ्यात दाखल होतील. या सर्व बसेस भाडेतत्त्वावरील असणार आहेत. एसटी प्रशासनाकडून 200 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन म्हणून त्यातील 50 बससाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे. काही महिन्यांत या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला कमी अंतराच्या मार्गावर त्या सोडण्यात येतील. यानंतर या बसेसची तांत्रिक क्षमता तपासून त्या 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या मार्गावर पाठवण्यात येणार असल्याचे देओल यांनी स्पष्ट केले. मुंबई विभागासह राज्यातील उर्वरित एसटीच्या आगारात टप्प्याटप्प्याने या बसेस दाखल होणार आहेत. सर्व ई-बस वातानुकूलित असणार असून भाडेतत्त्वावर त्या चालवण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या