एसटी संप चिघळला, जनतेचे हाल; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटी महामंडळाने केलेल्या वेतनवाढीला विरोध करण्यासाठी एसटी कर्मचाऱयांनी गुरुवारी रात्रीपासून अचानक अघोषित संप पुकारल्याने ग्रामीण भागात जनतेचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात संपाचा फटका बसल्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले मुंबईकर खिंडीत सापडले असून त्यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला आहे. या संपाची जबाबदारी कोणत्याच संघटनेने घेतली नसली तरी कामावर हजर न राहणाऱया ३०० ते ४०० कर्मचाऱ्यांवर राज्यभरात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी चार वर्षांचा ४ हजार ८५० कोटी रुपयांचा वेतन करार नुकताच करण्यात आला. त्यामुळे एसटी कर्मचाऱयांच्या केतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी काढ होणार आहे, मात्र मान्यताप्राप्त संघटनेने आपल्याला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने व इतर भत्ते व सुविधा कमी केल्याने संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेलेल्या ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले होते त्यांना फटका बसला आहे. दरम्यान, या संपामुळे सामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी बसेस, शाळेच्या बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहतुकीच्या वाहनांना वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

७० टक्के व्यवहार ठप्प

राज्यात एसटी महामंडळाचे १ लाख ५ हजार ६७९ कर्मचारी आहेत. तसेच एसटीच्या १८ हजार गाडय़ांतून दररोज ६५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जात असते. एसटीच्या वेतनकराराला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असला तरी त्यासाठी अधिकृतपणे कोणत्याही संघटनेने संपाची नोटीस दिलेली नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाची अडचण निर्माण झाली आहे. एसटीचे राज्यात २५० हून अधिक आगार आहेत. त्यापैकी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात एसटी संपाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक फेऱ्या रद्द झाल्याने ७० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. धुळे, नांदेड, अकोला, उरणमध्ये एसटीचे व्यवहार काही प्रमाणात सुरू होते. मुंबईत परळ, कुर्ला येथे दगडफेक झाली असून परळमध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्यामध्ये आठ कर्मचाऱयांना निलंबित केले. सोलापूर व यवतमाळ येथे पाच ते सात जणांना निलंबित करण्यात आले. मुंबई सेंट्रल या सर्वात मोठय़ा आगारात मात्र वाहतूक बऱयापैकी सुरू होती.

बीड

बीड जिह्यात एसटी कर्मचाऱयांच्या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळत असून जिह्यातल्या ११ आगारांमधून सकाळपासून एकही गाडी बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. येथील ३० एसटी कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, आंबेजोगाई डेपोचे वाहतूक नियंत्रक व्ही. पी. चाटे यांचे निलंबन करण्यात आले. चाटे यांच्याकडे कंडक्टर्सना लागणाऱया तिकीट मशीन्स देण्याची जबाबदारी असते, परंतु चाटे यांनी या मशीन्सचे वाटप न करता ते संपात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.

पालघर

पालघर आगारातील ६५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर लांब पल्ल्याच्या २६ फेऱ्या रद्द होऊन बोईसरमधील २६६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

रायगड

रायगड जिह्यातील 13 संघटना संपात सहभागी झाल्या. अलिबाग आगारातून दिवसभर केवळ 13 फेऱया चालविण्यात आल्या. पेण, कर्जत, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, व मुरूड आगारातील 326 फेऱया रद्द करण्यात आल्या

धाराशीव

जिह्यातल्या सर्व आगारांमधून 247 पैकी केवळ 17 बसेस बाहेर पडल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली. जिह्यातल्या कळंब, तूळजापूर आगारातले कर्मचारी संपावर गेले. धाराशीव आगारातील एसटी कर्मचाऱयांकडून संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भंडारा

भंडाऱ्यात मोठ्या संख्येने एसटी कर्मचाऱयांनी संपात सहभाग घेतला. रात्री निघणाऱया गाडय़ा पहाटे बाहेर पडल्या. दरम्यान, त्यानंतर मात्र बससेवा थांबवण्यात आली.

धुळे

धुळे परिवहन विभागात पहाटेपासून धुळे शहर मुख्य बस स्थानक वगळता जिह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा एसटी डेपोतून लांब पल्ल्याच्या गाडय़ा वगळता एकही बस रवाना झाली नाही. धुळे एसटी आगारातून किमान ५० टक्के बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, धुळे शहरात शिवसेनाप्रणीत कामगार सेनेसह १३ संघटनांनी या संपाला विरोध केल्यामुळे आगारातून ९० टक्के बसेस धावल्या.

नांदेड:

नांदेड जिह्यात संपाला हिंसक वळण लागले. भोकर याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. लातूर जिह्यात या संपाला ८५ टक्के प्रतिसाद मिळाला. कंधार आगारातील पाच एसटी कामगारांना निलंबित करण्यात आले.

संप कशासाठी

कामगारांना विश्वासात न घेता एकतर्फी पगारवाढ केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेतनवाढ मंजूर नसेल तर राजीनामा देण्यास सांगणे ही कामगारांवर बळजबरी असल्याचे जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे. घरभाडे भत्त्याचा दर कमी करणे, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांवरून २ टक्के करणे, वेतनवाढ मान्य नसल्यास राजीनामा देण्यास सांगून पुन्हा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करण्यास भाग पाडणे हे कामगारांवर अन्याय करणारे असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

१५ कोटींचे नुकसान

या अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे १५ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दिकसभरात महाराष्ट्रातील २५० आगारांतून सुमारे ३० टक्के फेऱया सुटल्या, राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच १४५ आगारांमध्ये अंशत: काहतूक सुरू होती. तसेच राज्यातील ८० आगारांतून दिकसभरात एकही एसटी सुटली नाही. या संपाचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिह्यांत मोठय़ा प्रमाणात जाणकत आहे. तुलनेने मराठकाडा आणि किदर्भामध्ये ६० टक्के काहतूक सुरू होती. संध्याकाळी चार काजेपर्यंत होणाऱया ३५,२४९ बस फेऱयांपैकी १०,३९७ फेऱया सुरळीत सुरू होत्या.

आधी पगार घ्या, चिथावणीला भुलू नका!

एसटी कर्मचाऱयांच्या कोणत्याही अधिकृत संघटनेने या संपाबाबत प्रशासनाला कळवलेले नाही. त्याचप्रमाणे कर्मचारी रजेवर जाणार असल्याचीही नोंद नाही. त्यामुळे हा संप अधिकृत नाही. एसटी कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार पगारवाढ दिली आहे. त्यामुळे त्यांनी हा वाढीव पगार आधी घ्यावा. त्यांनी कुणाच्याही चिथावणीला भूलू नये. त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज केले.

काही एसटी डेपोंमधील कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱयांना कामावर परतण्याचे आवाहन दिवाकर रावते यांनी केले. एक लाखाहून अधिक कर्मचाऱयांचे पगार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका किती पगार मिळेल याबाबत कर्मचाऱयांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत पहिल्यांदा पगार आणि पगाराची स्लिप हाती घेतल्यानंतरच नेमकी किती वाढ झाली याचा अंदाज त्यांना येईल. कधीही झाली नाही इतकी पगारवाढ या वेतनात सातव्या वेतन आयोगाचे सूत्र वापरून देण्यात आली आहे. त्यानंतर कुणाशीही चर्चेसाठी तयारी आहे. त्यामुळे कुणाच्याही चिथावणीवरून आंदोलन करू नका. या संपाबाबत कोणतीही नोटीस नसल्याने जे कर्मचारी संपावर गेले आहेत त्यांच्यावर प्रशासन नियमानुसार कारवाई करीत आहे, असे रावते म्हणाले.

युनियनच्या अस्तित्वासाठी कारस्थान

कर्मचाऱयांना चांगली वेतनवाढ मिळाल्याने आता आपले अस्तित्व धोक्यात येईल, या भीतीपोटी काही युनियननी संपाला चिथावणी दिली आहे. संपाचे दायित्व स्वीकारायला कोणतीही संघटना तयार नाही. हा या युनियनच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांचे हे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी या चिथावणीला बळी पडू नये, असे दिवाकर रावते म्हणाले.