हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; 8 भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली . या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले. डोंगरावर हे मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी 800 पायऱ्या चढायला लागतात. मंदिरापासून अवघ्या 25 पायऱ्याखाली प्रचंड गर्दी वाढली. रेटारेटी सुरू झाली.. त्यातच विजेची तार तुटून जिन्यात करंट पसरल्याचे कुणीतरी ओरडले आणि एकच गों धळ उडाला, आरडाओरड, आक्रोश सुरू झाला. एकमेकांमेकांना तुडवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच चेंगराचेंगरी झाली आणि आठ भाविकांवर मृत्यूने देवीच्या दारातच झडप टाकली.

या घटनेचे व्हिडीओ आता समोर येत आहेत. रविवारच्या सुटीचा मुहूमुहूर्त साधून भाविकांनी मंदिरामध्ये तुफान गर्दी केली. गर्दी इतकी वाढली की, प्रचंड रेटारेटी सुरू झाली. चेंगराचेंगरी बाबत माहिती मिळताच पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू झाले. मृत भाविकांना इतर राज्यातील भाविकांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची माहिती गढवालचे पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी फेटाळून लावली. या घटनेप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
चेंगराचेंगरीच्या या घटनेचे महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई तर जखमी झालेल्यांना उपचारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.