राज्यातील विमानतळांच्या विकासाला गती, शिर्डी विमानतळासाठी 34.95 कोटी; रत्नागिरीसाठी 10.67 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देण्यासाठी शासनाने 85 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिर्डी, रत्नागिरी, नांदेड आणि लातूर विमानतळांसह प्रादेशिक हवाई संपर्प योजना (आरसीएस) अंतर्गत विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास पंपनीला हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी लेखाशीर्ष 30530164 अंतर्गत 1300 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतून महाराष्ट्र विमानतळ विकास पंपनीने विविध विमानतळांच्या विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने 85.92 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

निधी सहायक अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निधी वितरणासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या विमानचालन विभागातील सहसचिव अथवा उपसचिव यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विमानचालन संचालनालयाच्या स्तरावर देयके अदा करण्यासाठी उपसंचालकांना आहरण व संवितरण अधिकारी, तर संचालकांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हा निधी सशर्त असून ज्या विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. 31 मार्च 2027 पूर्वी संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास पंपनीवर सोपविण्यात आली आहे. निधी पीएलए अथवा बँक खात्यात जमा न करता निर्धारित कामांसाठीच खर्च करावा लागणार आहे. तसेच खर्चाचा वेळोवेळी आढावा घेऊन विहित मुदतीत उपयोगिता प्रमाणपत्र शासन आणि महालेखापाल कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिर्डी विमानतळ- 34.95 कोटी रुपये

रत्नागिरी विमानतळ- 10.67 कोटी रुपये

नांदेड विमानतळ- 4.15 कोटी रुपये

लातूर विमानतळ- 4.15 कोटी रुपये