
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास 22 लाख रुपये खर्चून वातानुकूलित बस भेट दिली आहे. मंदिर परिसरातील नो व्हेईकल झोनमुळे दिव्यांग, गर्भवती स्त्रिया व वृद्धांना मंदिरापर्यंत पोहोचण्यास अडचण होत होती. या बसमुळे ती अडचण दूर होणार आहे. यापुढेही देवस्थानला गरज लागेल, तेव्हा बँक मदतीचा हात पुढे करेल, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.