स्टेट बँकेची 12 हजार कोटींची थकीत कर्जे गायब

537

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेपुढे थकीत कर्जाच्या मोठय़ा घोटाळ्याचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 12 हजार कोटींची थकीत कर्जे गायब झाल्याची धक्कादायक माहिती स्टेट बँकेने शेअर बाजाराला कळवली आहे. यावर आता रिझर्व्ह बँक कोणती भूमिका घेतेय, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

  • 2018-19 या आर्थिक वर्षात स्टेट बँकेकडे एकूण 1 लाख 84 हजार 682 कोटींची कर्जे थकीत होती.
  • मात्र बँकेने 1 लाख 72 हजार 750 कोटींची थकीत कर्जे असल्याचे जाहीर केले.
  • यावरून 11 हजार 932 कोटींची थकीत कर्जे ताळेबंदातून गायब झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे.
  • स्टेट बँकेची निव्वळ थकीत कर्जे 77,827 कोटींची असताना लेखा परीक्षण अहवालात ती 65,895 कोटींची असल्याचे दाखवण्यात आले.
  • यातील तफावतीमुळे बँकेला 12,036 कोटींची अतिरिक्त तरतूद करावी लागली असती.
  • परिणामी 6,968 कोटींचा तोटा झाला असता. बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 862 कोटींचा नफा झाला होता.

बँकांकडून ताळेबंद किंवा लेखा परिक्षणात बुडीत कर्जांचा आकडा कमी दाखवण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला कारवाईची पावले उचलावी लागली आहेत. अशातच आता स्टेट बँकेची 12 हजार कोटींची थकीत कर्जे गायब झाली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून या प्रकरणात रिझर्व्ह बँक कोणती कारवाई करतेय, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या