एसबीआयच्या एफडी व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँकेने लाखो ग्राहकांना जोरदार झटका देत एफडी व्याजदरात कपात केली. एसबीआयने एफडीच्या व्याजदरात 20 बीपीएसने कपात करत व्याजदर 3.30 टक्के ते 6.70 टक्क्यांवर आणले. याआधी हे दर 3.50 ते 6.90 टक्के होते. एसबीआयने अमृत वृष्टी योजनेतील व्याजदरातसुद्धा कपात केली आहे. 444 दिवसांसाठी याआधी बँक 7.05 टक्के व्याज देत होती. आता कपात केल्यानंतर 6.85 टक्के व्याजदर देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधी 7.45 टक्के व्याजदर मिळत होता. आता 7.35 टक्के व्याजदर देणार आहे.