मैत्रिणीला 3 टक्के जास्त मार्क मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

869

उत्तर प्रदेशात दहावीचे निकाल लागलेले आहेत. या निकालानंतर काहींना आनंद झाला आहे तर काहींना अपेक्षेप्रमाणे मार्क न मिळाल्याने निराश व्हावं लागलं आहे. मात्र एका विद्यार्थिनीला निराशेने इतकं छळलं की तिने थेट आत्महत्या केली. अनीसा असं या विद्यार्थिनीचे नाव आहे.

धामीखे़डा इथे राहणाऱ्या श्रवणकुमार यांनी अनीसा मुलगी होती. आपल्या बायकोसोबत श्रवणकुमार भाच्याचा लग्नासाठी गेले होते. घरामध्ये अनीसा तिचा मोठा भाऊ वहिनी आणि लहान भाऊ होते. अनीसाला दहावीच्या परीक्षेत 82 टक्के मार्क मिळाले होते. मात्र तरीही ती खूश नव्हती. घरच्यांनी तिला समजावून सांगितलं की हे चांगले मार्क आहेत आणि निराश होण्याचे काहीच कारण नाहीये. मात्र तरीही अनीसाचं समाधान झालं नव्हतं. अनीसाचा मोठा भाऊ हा रात्री बाथरूमला उठला असताना त्याला अनीसाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी घटनेची चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना कळालं की अनीसाच्या मैत्रिणीला अनीसापेक्षा 3 टक्के जास्त मार्क मिळाले होते. हा धक्का अनीसाला सहन झाला नव्हता, कारण अनीसा स्वत:ला मैत्रिणीपेक्षा हुशार समजत होती. द९हावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आपली बदनामी होई अशी तिला भीती वाटायला लागली होती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या