गुड न्यूज… राज्य कर्मचाऱयांचा डीए वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी | मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ  करण्यात आली आहे. महागाई भत्त्यातील वाढ 1 ऑक्टोबरपासून रोखीने देण्यात येणार आहे, तर 1 जानेवारी ते सप्टेंबर 2018 या नऊ महिन्यांतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 139 टक्क्यांवरून 142 टक्क्यांवर पोहचला आहे.