राज्य कर्मचारी बुधवारी संपावर?

471
strike

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा. निवृत्तीचे वय 58 वर्षावरुन 60 वर्षे करावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या संपास पाठिंबा दिला असून महासंघाकडून राज्यव्यावी लक्षवेध दिन पाळण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील विविध कामगार संघटनांनी 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱयांनी पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी योजना सुरू करावी, महागाई भत्त्याची थकबाकी व केंद्राप्रमाणे अन्य भत्ते आदी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीच्या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा. शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या