
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन स्मृतिस्तंभाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी बोलतना मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर राज्यसरकार त्याला सर्वशक्तीनिशी पाठिंबा देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी मराठवाड्यासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने मोठ्या संयमाने लढा देत मराठवाड्यालाही मुक्ती मिळवून दिली आहे, तसाच लढा कोरोनामुक्तीसाठी द्यायचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा
1. संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील 144 निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार
2. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
3. परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
4. धाराशीव वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू
5. सिथेंटीक ट्रॅकचे काम संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल येथे
6. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी
7. संभाजीनगर – नगर रेल्वे मार्गाला चालना
8. संभाजीनगर – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
9. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये
10. संभाजीनगर : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317.22 कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
11. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350 कोटी रुपये
12. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना जल जीवन अभियानातून 105 कोटी रुपये
13. उस्मानाबाद शहराची 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
14. संभाजीनगर : 1680 कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. 4.50 कोटी
16. संभाजीनगर – शिर्डी या 112. 40 किमी मार्गाची श्रेणीवाढ
17. समृद्धीला जोडणाऱ्या 194.48 कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
18. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार
19. संभाजीनगर सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
20. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
21. संभाजीनगर शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव 28 कोटी रुपये खर्च
23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास . 86.19 कोटी रुपये खर्च येईल.
24. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.





























































