19 ऑगस्टला दहीहंडीची सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने येत्या 19 ऑगस्टला दहीहंडीची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगर जिह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये गोपाळकाला या सणाच्या दिवशी बंद राहातील.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच यंदाच्या वर्षीची सुट्टी जाहीर केली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 7 डिसेंबर 2021रोजी  शासन परिपत्रकाद्वारे यावर्षीची गोपाळकाला म्हणजे दहीहंडीच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. त्याशिवाय 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशीही मुंबई शहर व उपनगर जिह्यात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.