Share Market News – शेअर बाजार तेजीत, गुंतवणुकदारांचा उत्साह; नवे उच्चांक गाठण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान- अमेरिका व्यापार करार झाल्यानंतर शेअर बाजारातील मरगळ आणि दबाव दूर झाला आणि गेल्या आठवड्यात दोन दिवस बाजाराने चांगली तेजी दाखवली. मात्र, त्यानंतर आयटी सेक्टरवरील दबाब वाढला आणि पुन्हा बाजारात मंदी जाणवत होती. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांनी चांगलाच उत्साह दाखवला असून त्यामुळे शेअर बाजार चांगलाच तेजीत आला आहे. सोमवारी शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्सने ८४,००० चा टप्पा ओलांडला, तर निफ्टी २६,००० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजार आता लवकरच नवीन उच्चांक गाठेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीत उघडला. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक (बीएसई सेन्सेक्स) उघडताच ८४,००० च्या पुढे गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक (एनएसई निफ्टी) उघडताच २६,००० च्या जवळ पोहोचला. एसबीआय, टाटा स्टील, टायटन आणि आयटी क्षेत्रातील कंपन्या टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअर्सनाही तेजी दिसून आली.

शेअर बाजार उघडताच, बीएसई सेन्सेक्स ८४,१७७ वर उघडला, त्याच्या मागील बंद ८३,५८०.४० पेक्षा जास्त होता. काही सेकंदातच तो ७०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८४,३१४.६८ वर पोहोचला. 10.15 वाजता 385.78 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.46 टक्के वाढीसह तो 83,954.12 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी देखील २५,८८८.७० वर उघडला, जो शुक्रवारी बंद झालेल्या २५,६९३.७० पासून वाढला आणि नंतर २५,९२२ वर पोहोचला. 10.15 वाजता तो 127.20 अंकांच्या वाढीसह तो 25,795 . 20 वर व्यवहार करत होता.

सोमवारी आयटी क्षेत्र णि सार्वजनिक बँकांच्या क्षेत्रात चांगली तेजी दिसून आली. एसबीआय शेअर (६.२०%), टायटन शेअर (२%), इटरनल शेअर (१.५०%), कोटक बँक शेअर (१.४६%), टाटा स्टील शेअर (१.३०%) हे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. शिवाय, लार्ज-कॅप श्रेणीमध्ये टीसीएस, रिलायन्स, बीईएल, टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिस देखील तेजीत होते. मिडकॅप्समध्ये, गोदरेज प्रॉपर्टीज शेअर (४.९०%), भारत फोर्ज शेअर (२.१०%), पॉलिसी बाजार शेअर (२.१०%). भेल शेअर (१.८०%) तेजीने व्यवहार करत होता, तर स्मॉलकॅप श्रेणीमध्ये हिंदुस्तान कॉपर शेअर (४.३०%) आणि पूनावाला शेअर (२.५०%) तेजीने व्यवहार करत होते.

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार जोरदार तेजीने बंद झाला. तर सोमवारी अनेक आशियाई बाजारांमध्येही प्रचंड वाढ दिसून आली. त्यामुळे बाजाराला सकारात्मक संकेत येत असल्याने बाजारात तेजीचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. आता बाजार लवकरच ऑल टाईम हायजवळ पोहचेल आणि नवीन उच्चांक गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.