‘अमंगल’वार! शेअर बाजारात पडझड

हिंदुस्थानी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मंगळवार खऱ्या अर्थाने अमंगलवार ठरला. विदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने हिंदुस्थानी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277 अंकांनी घसरून 84,673 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 103 अंकांनी घसरून 25,910 अंकांवर बंद झाला.