शेअर बाजार उसळल्याने गुंतवणूकदारांची चांदी

बुधवारी शेअर बाजार उसळला. यामुळे गुंतवणूकदारांनी 12 हजार कोटी रुपयांची कमाई केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 82,515 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांनी वधारून 25,141 अंकांवर स्थिरावला. बीएसई लिस्टेडमधील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 455.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मंगळवारी ते 455.41 लाख कोटी रुपयांवर होते. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 16 शेअर्स वाढीसोबत बंद झाले, तर 14 शेअर्स घसरून स्थिरावले. टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्री आणि बजाज फिनसर्वचे शेअर्स वाढले, तर पॉवर ग्रीड, अदानी पोर्टस्, इंड्सइंड बँक, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली.