श्रीरामपूरमध्ये आभाळ कोसळले, नागरीक भयभीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगरमधील श्रीरामपूर तालुक्यात माळवाडगांव शिवारात शुक्रवारी दुपारी एका शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून बर्फाच्या लादी सदृष्य वस्तू पडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने शेतात काम करणाऱ्या महिला आणि शेतमजूर भयभीत झाले होते. मात्र कोणालाही इजा न झाल्यामुळे याबाबत पंचक्रोषीत कुतूहल निर्माण झाली आहे.

माळवाडगांव येथील शरद शेरकर यांच्या शिवारात महीला आणि कामगार काम करत असताना निसर्गाचा अदभूत अविष्कार पहायला मिळाला. या वेळी एखाद्या विमान किंवा हेलीकॉप्टर प्रमाणे आवाज करत सात ते आठ फुट लांबीची बर्फाची भल्या मोठ्या लादी सदृष्य वस्तू शेतात कोसळ्याचे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोराच्या आवाजाने लोक सावध झाल्याने जीवीत हाणी टळली. सात ते आठ फुट लांबीची लादी जमिनीवर कोसळल्यामुळे शेतात जवळपास दीड फुट खोल खड्डा पडला. ही लादी आपटल्याने फुटली होती. या लादीचे तुकडे सर्वत्र पसरले होते.