
येत्या 8 जानेवारीस केंद्र आणि राज्याच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला ऑल इंडियन रेल्वे मेन्स फेडरेशनने (एआयआरएफ) पाठिंबा दर्शवला असतानाच नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन्स यांनी 2 पासून 7 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या कामगार धोरणांविरोधात ‘ निषेध सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रेल्वे कर्मचाऱयांनी कोणत्याही आंदोलनात काम सोडून सहभाग घेतला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. 8 जानेवारीस केंद्रीय व राज्य कामगारांचा देशव्यापी संप आहे.
त्यामुळे मुंबईची लाइफलाइन सोमवारी ठप्प होण्याची भीती आहे. ऑल इंडियन रेल्वे मेन्स फेडरेशनने (एआयआरएफ) पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन्सने 2 ते 7 जानेवारीपर्यंत केव्हाही विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यात गेट मीटिंगसह अनेक लोकल ट्रेन रोखण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने सावधान होत अशा कर्मचाऱयांवर रेल्वे कायदा-1819 कलम-173, 174 आणि 175अन्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, रेल्वेच्या विविध मान्यताप्राप्त युनियननी आम्ही कामावरून सुटल्यावर संसदीय मार्गाने आंदोलन पुकारू, असा दावा केला आहे.



























































