
पिंपरीतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याने तीन आठवड्यांपूर्वी केलेली आत्महत्या ‘गे’ अॅपच्या माध्यमातून खंडणी उकळल्याने झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रुपमधील एका विद्यार्थ्यासोबत नग्न फोटो आणि व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागितल्याने विद्यार्थ्याने बदनामीपोटी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची ‘गे’ अॅपवरून आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी ग्रुपमधील एका विद्यार्थ्यासोबत संबंधित विद्यार्थ्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. विद्यार्थ्याने नातेवाईकाकडून 35 हजार रुपये घेतले आणि आरोपींना दिले. यामुळे बदनामी होईल, या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले





























































