सेल्फी काढताना पाय घसरून विद्यार्थी नदीत बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील बोर्डी नदी मध्ये १५ वर्षीय मुलगा सेल्फी काढत असतांना तोल जाऊन पडला व पाण्यात वाहून गेल्याची घटना आज २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८च्या दरम्यान घडली आहे.

मागील ४-५ दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. आज खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द या गावाजवळ वाहणारी बोर्डी नदीवर बांधलेल्या बंधार्‍यावर आज सकाळी ४-५ विद्यार्थी पोहचले. सेल्फी काढत असतांना हेमंत राजेश जागींड (१५) याचा तोल सुटुन तो खाली नदीत पडला. दुथडी भरून वाहणारी नदीच्या पाण्यात हेमंत वाहून गेला. अशी माहिती त्याचे मित्रांनी दिल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले तसेच पोलीसही दाखल झाले असून हेमंतचा शोध सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत हेमंतचा शोध लागला नव्हता.