उत्तर पत्रिका दाखवली नाही म्हणून विद्यार्थ्यावर चॉपरने वार

प्रातिनिधिक फोटो

कोपरगाव येथील एका शाळेत उत्तर पत्रिका दाखविली नाही म्हणून वर्गातील आठ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साद शफिक शेख वय (14) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सादला चॉपरच्या मागील बाजूने डोक्यात मारल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरून आठ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने शाळा परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या सबंधी एस जी विद्यालयातील इ.9 वीचा विद्यार्थी साद शफिक शेख याने १). जय तुळशीदास लहिरे रा.महादेवनगर २). यश सचिन शिंदे रा.टिळकनगर ३). कृष्णा संतोष वाणी रा.गजानननगर ४). ॠषीकेश लक्ष्मण त्रिभुवण रा.सुभाषनगर ५). यश सुनिल जाधव रा.जेऊरपाटोदा ६). ओम किरण पठाडे रा.हनुमाननगर ७). गौरव सुभाष पंडोरे रा.निवारा ८). अभिषेक कैलास मंजुळ रा. महादेवनगर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (24) रोजी सकाळी 8 वाजता हिंदी विषयाचा पेपर होता. पेपर लिहित असताना माझ्या मागे बसलेल्या गौरव पंडोरे याने मला पेपर दाखव असे सांगितले. मी त्याला पेपर दाखविण्यास नकार दिला. त्याला याचा राग आला होता. तेव्हा तो मला म्हणाला की पेपर सुटल्यावर तू खाली भेट तुला दाखवतो. पेपर सुटल्यानंतर माझ्या हाताला पेनची शार्इ लागल्याने हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेलो. काही विद्यार्थी मला शिवीगाळ करू लागले. त्यावरून आमच्यात वाद झाला. त्यानंतर जय तुळशीदास लहिरे याने त्याच्या हातातील चॉपरच्या मागील बाजुने माझ्या डोक्यात वार केला.त्यानंतर बाकी आरोपींनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली’ या प्रकरणी कोपरगांव पोलिसांनी वरील आठही मुलांविरुद्ध भा द वि कलम 323,324,504, 506, 143, 147,148,149 गु र नं 33/2020 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली बी एस कोरेकर पुढील तपास करीत आहे.

ही सर्व आठ मुले 14 ते 15 वयोगटातील असून इयत्ता नववी मध्ये शिकत आहे पुढचे दहावीचे वर्ष हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. आज ही मुले शाळेमध्ये चॉपरसारखे हत्यारे वापरतात. ही बाब गंभीर असून शिक्षकांबरोबरच पालकांनीही याची दखल घेतली पाहिजे. आज या मुलावर शिकण्याच्या वयात गंभीर गुन्हा दाखल झाला असून भविष्यात ही बाब चिंताजनक आहे

आपली प्रतिक्रिया द्या