`सीए’ परीक्षेसाठी 6 मेपर्यंत अर्जाची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीए परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थी आता 6 मेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

लॉकडाऊन किंवा अन्य अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही सीए परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही त्यांच्यासाठी आयसीएआयने ही सुविधा दिली आहे. ते विद्यार्थी 4 मेपासून अर्ज करू शकणार आहेत. 6 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत त्यांना अर्ज करता येणार आहे. मे महिन्यातच सीएची परीक्षा घेतली जाणार होती, परंतु कोरोना परिस्थिती गंभीर बनल्याने ती स्थगित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी नव्याने मिळाली आहे.