
कोरोना संक्रमण काळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलन तूट भरून काढण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनतर्फे नुकतेच आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत शैक्षणिक आकलनात 22 टक्के तूट दिसली आहे. यावर उपाय म्हणून सध्याच्या पाठ्यक्रमाच्या आधारे पुढील तीन महिन्यांत मराठी, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांचा एकशे तीन तासांचा अभ्यासक्रम सेवा सहयोग फाउंडेशन तयार केला आहे. किमान मूलभूत अभ्यासक्रम शिकवून शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची त्यांची योजना आहे.






























































