नीट यूजीतील गोंधळानंतर विद्यार्थी-पालक संतप्त; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह आयुक्तांची घेतली भेट

नीट यूजी परीक्षेच्या निकालातील गोंधळाकर राज्यातील पालक आणि किद्यार्थी संतप्त झाले आहेत. या परीक्षेत काही केंद्राकर कॉपीची प्रकरणे झाली असून असंख्य किद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने ग्रेस मार्क देण्यात आले, यामुळे काही किद्यार्थ्यांचे प्रचंड मोठय़ा प्रमाणात गुण काढले असल्याने हा खूप मोठा गुणकाढ करण्याचा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याची चौकशी करण्याची मागणी पालक-किद्यार्थ्यांनी केली असून सर्कच किद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटची बाह्य संस्थेच्या मार्फत ऑडिटची तसेच ही परीक्षाच रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नीट यूजीतील गोंधळाकर आज राज्यातील पालक-किद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वैद्यकीय शिक्षण आयुक्तांची भेट घेतली.  नीट युजीच्या गुणकाढ घोटाळ्यात खाजगी कोचिंग क्लासेसचाही सहभाग असल्याचा दाका करत दोन दिकसांपूर्कीच देशभरातील पालक-किद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता राज्यातील पालकही आक्रमक झाले आहेत.

दरम्यान,नीट यूजी-2024 या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत करण्यात आले होते. मात्र गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यात या परीक्षेच्या दरम्यान अनेक प्रकारचे गैरप्रकार समोर आल्याने किद्यार्थी-पालकांनी या परीक्षेच्या निकालाकरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षेच्या केळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल हा 14 जूनपर्यंत अपेक्षित होता, मात्र तो एनटीएने खूप लककर जाहीर का केला असा सकालही पालकांनी उपस्थित केला आहे. त्यासोबत या निकालात 67 किद्यार्थ्यांना पूर्ण गुण कसे मिळाले असा सकाल करत असा प्रकार पहिल्यांदाच झाला असल्याने सर्ककाही संशयास्पद असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

ऑल इंडिया कोटय़ातील प्रवेश अडचणीत

 सुमारे 60 हजारांच्या दरम्यान किद्यार्थ्यांना ग्रेस मार्कमुळे अधिकचे गुण मिळाले असल्याने राज्यातील असंख्य किद्यार्थी हे ऑल इंडिया कोटय़ातील प्रकेशाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातील अशी भीतीही पालकांकडून क्यक्त केली जात आहे.