ट्रेंड – स्टायलिश फुटवेअर

सध्या देशभरात नवरात्रोत्सव सुरू आहे. ठिकठिकाणी दांडिया आणि गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया आता केवळ गरबा खेळण्यापर्यंत मर्यादित राहिला नाही. दांडिया खेळण्यासाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल चप्पल व बुटांचाही ट्रेंड आला आहे. स्टायलिश फुटवेअर तेही मॅचिंगसाठी तरुणांची धावपळ उडत आहे. ज्या रंगाचे कपडे परिधान केले असतील त्याच रंगाचे बूट आणि चप्पल घालण्यासाठी तरुण-तरुणींचा कल दिसत आहे. यासाठी ते वाट्टेल तितकी किंमत मोजायलाही तयार असल्याचे दिसत आहे. गरब्यात सर्वांचे लक्ष आपल्यावर असावे यासाठी हा खटाटोप आहे.