
एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचार्यांच्या ग्रॅच्युएटीची (उपदान) मर्यादा दहा लाखांहून 14 लाख करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकराकर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू केले जाणार आहे, याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 58 वा वर्धापनदिनी केली आहे.
सुभाष देसाई यांनी वर्धापनिदनानिमित्त मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्याच्या प्रगतीत महामंडळाचा खारीचा वाटा आहे. जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त संघटनेत एमआयडीसीचा अभिमानाने उल्लेख केला जातो. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसीला जागतिक दर्जाचे महामंडळ बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या कल्याणासाठी ग्रॅच्युएटीची मर्यादा दहा लाखांकरून 14 लाख करण्यात येईल. येत्या काळात महामंडळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभे केले जाणार आहे. या निमित्ताने देश-विदेशातील गुंतकणूक राज्यात येईल. याशिवाय रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आदर्शवत फार्मा पार्क सुरू केले जाईल.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव की. वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, अभिषेक कृष्णा, एमआयडीसी कर्मचारी संघटनेचे हेमंत संखे, किलास संखे, सुधाकर वाघ, डी. बी. माली, पी. डी. मलिकनेर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.





























































