
देवगड बंदरातील त्रिवेणी बोट समुद्रात बुडाल्याची घटना 18 सप्टेंबर रोजी घडली. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग किल्ल्यासमोर 11 वाव जवळ दिसल्यानंतर देवगड बंदरातील मच्छीमार बोटी व बांधव मदतीसाठी सरसावले. आणि 48 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दोरखंडाच्या सहाय्याने त्रिवेणी नौका किनाऱ्यावर आणण्यात आणि देवगड जेटीवर काढण्यात मच्छिमार बांधव व नौका मालक याना यश आले आहे. या अपघातग्रस्त बोटीचे सुमारे 30 लाखाचे नुकसान झाले आहे. जेटीवर नौका आणून नुकसानीची पहाणी करून प्राथमिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विजयदुर्ग किल्ल्यासमोर अकरावांमध्ये त्रिवेणी बोट सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दिसून आल्यानंतर देवगड बंदरातील निर्मल,म्हाळसा मल्हार, देवयानी,हेमांगी या चार बोटी अपघात ग्रस्त त्रिवेणी बोटीच्या मदतीला धावल्य. यानंतर अनेक तासाच्या प्रयत्नानंतर बोटीला दोरखंड बांधण्यात मच्छीमार बांधवांना यश आले. यामध्ये अक्षय हरम,आकाश हरम,महेश सागवेकर, नटेश्वर धुरी, मिलिंद मुणगेकर,बापू सागवेकर यांनी आपल्या जीवाची परवा न करता समुद्रात उड्या घेत बोटीला दोरखंड बांधला. यांच्या मदतीसाठी नगरसेवक बुवा तारी,राहुल मुणगेकर, आकाश हरम, पप्पू जगताप,भरत हरम,हितेश हरम आधी मच्छिमार उपस्थित होते.