
सुदानमध्ये देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या लष्कर व निमलष्करी दलातच युद्ध पेटले आहे. दोन्ही दलं एकमेकांच्या तळांवर हल्ले चढवत आहेत. या भयंकर परिस्थितीमुळे सुदानमधील हिंदुस्थानी दुतावासाने तेथील हिंदुस्थानींना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत.
सुदानमध्ये राजधानी खार्तूमसह देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी दुतावासाने हिंदुस्थानी नागरिकांसाठी काही आश्रय केंद्रे उभारली असून तेथे त्यांना थांबण्यास सांगण्यात आले आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानींना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.


























































