
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अतिशय भयंकर आहे. या प्रकरणात खरातला कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी कायद्यात बदल करून खरातसारख्या नराधमांना भरचौकात उभे करून सुया टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जिथे स्त्राrला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते, मात्र या भोंदूबाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी खरातला भरचौकात सुया टोचून टोचून मारले पाहिजे. देशातील सर्व भोंदूबाबांना यातून ‘याद रखो, तुम्हारी मौत पक्की है’ असा इशारा दिला पाहिजे, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले.































































