
सामना प्रतिनिधी । नांदुर्गा
औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवाशी सुधीर तुकाराम मोरे यांच्या शेतातील जमीन सर्वे नं १६०/अ क्षेत्र १ हेक्टर ५५ आर मधील ऊस तसेच ठिबक सिंचनचे संपूर्ण पाईप पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
ही आग १ एप्रिल २०१९ रोजी दुपारी विद्युत तारांमध्ये शॉटसर्किट झाल्यामुळे लागली, असे शेतमालक सुधीर मोरे यांनी सांगितले. या आगीमुळे ठिबक सिंचन सेट तसेच ऊसाचे पाच लाखाचे नुकसान झाले असून जळालेल्या ऊसाचा पंचनामा नांदुर्गा सज्जाचे तलाठी गहीरवार यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत महावितरण यांच्याकडे चौकशी केली असता घडलेल्या घटनेचा रीतसर तपशील घेऊन वरीष्ठाकडे सादर करणार असल्याचे किल्लारी सर्कलचे सी. ई. बावगे यांनी दै. “सामना”शी बोलताना सांगितले.





























































