
विधानसभेत उत्तर देण्यासाठी मंत्रीच नसल्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आज आली. नाशिकच्या मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराच्या संदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर चर्चेसाठी गृहमंत्री नसल्याने कांदे संतप्त झाले आणि आम्ही काय सातवी नापास नाही, समीर भुजबळांचा पराभव करून निवडून आलो आहे, अशा शब्दांत खदखद व्यक्त केली. दरम्यान बालिकांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्दय़ावरून सदस्यांनी सरकारला धारेवर धरले.





























































