माझी आई अजूनही काँग्रेसमध्ये – सुजय विखे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे यांनी माझी आई अजून काँग्रेसमध्ये आहे, असे विधान केल्याने अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्या अजूनही काँग्रेसच्या सदस्य असल्याचे सांगत त्यांचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील असे सांगून काँग्रेसकडूनच त्यांना पुन्हा संधी मिळेल, असा विश्वास खासदार सुजय विखेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद वाचवण्यासाठी विखे नवी खेळी खेळत आहेत का, याबाबतच चर्चा रंगलीय. 31 डिसेंबरला नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आहे.