सुप्रसिद्ध शिवकथाकार सुमंत टेकाडे यांचे अवघ्या 38 व्या वर्षी कोरोनामुळे निधन

युवा शिवकथाकार सुमंत टेकाडे यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 38 वर्षांचे होते. आजच्या व्यवस्थापन युगात तंतोतंत खरे उतरणारे शिवरायांचे आदर्श अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मांडणारे म्हणून सुमंत हे परिचित होते.सुमंत हे उच्चशिक्षित होते. त्यांनी बंगळुरु येथून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. Wipro च्या मनुष्यबळ विकास विभागात ते कामाला होते.

संघासाठी काम करायची ओढ असल्याने सुमंत यांनी नोकरी सोडून प्रचारक बनण्याचा निर्णय घेतला होता. सुमंत यांनी व्यवस्थापन विषयात PhD मिळवत S.P.Jain महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणूनही काम केले होते. ही नोकरी सोडल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य यावर व्याख्याने द्यायला सुरुवात केली होती. लोभस व्यक्तीमत्व आणि उत्कृष्ट वक्ता असल्याने सुमंत यांनी अल्पावधीत प्रसिद्धी मिळवली होती. सुमंत हा नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी श्री दत्ता टेकाडे यांचा मुलगा होता. सुमंत यांच्या पश्चात पत्नी माधवी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या