आजारी सूर्य फिका पडू लागला, प्रकाशात पाच टक्‍क्‍यांनी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीचा ऊर्जेचा एकमेव स्त्रोत असलेला सूर्य आता आजारी पडू लागला आहे. सूर्याची प्रकाश देण्याची क्षमता पाच टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. आकाशगंगेच्या इतर ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याचे तेज फिके पडू लागल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जर्मनीतील मॅक्स प्लेक्स इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलेला आहे. सूर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा एकमेव स्त्रोत आहे. मागील नऊ हजार वर्षांपासून तो कमजोर होऊ लागला आहे असा दावाही या वैज्ञानिकांनी केला आहे. सूर्यमालेतील इतर ताऱ्यांच्या चमक आणि रोटेशन यांच्या आधारे हे संशोधन करण्यात आले. मागील नऊ वर्षांपासून सोन्याची चमक पाच टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. वैज्ञानिक डॉक्टर अलेक्झांडर यांनी सांगितले की आकाशगंगेचे सुर्यापेक्षा अधिक जेत असलेले तारे आहेत. सूर्याची त्याच्यासारख्या तब्बल अडीच हजार ताऱ्यांसोबत केलेल्या तुलनेनंतर आम्ही हा निष्कर्ष काढला आहे.

सूर्यावरील सोलर स्पोर्टची संख्या कमी
वैज्ञानिक डॉक्टर टीमो रिनहोल्ड यांनी सांगितले गेल्या सात हजार वर्षांपासून सूर्य खूपच शांत झाला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सोलर स्पोर्ट तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. इसवी सन 1610 नंतर सोलर स्पोर्ट तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी 264 दिवसानंतर सूर्यावर एकही सोलर स्पोर्ट तयार झाला नव्हता. सूर्याच्या पृष्ठभागावर उष्णतेची लहर आल्यानंतर त्याचा विस्फोट होऊन अंतराळात सौरव वादळ उठते.