
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्ताने पुणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘मिनी सरस सावित्री जत्रा’ या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सुनेत्रा पवार पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यू आणि पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीबद्दल प्रथमच भाष्य केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, या अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे. मात्र, संपूर्ण अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरी ल निवडीबद्दल सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, राज्यसभा हे देशातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्यांचे सभागृह आहे. राज्यसभा हे उच्च आणि अनुभवी लोकांचे सभागृह आहे. त्यामुळे तिथे काम करताना सर्वप्रथम सभागृहाची कार्यपद्धती, नियम आणि परंपरा समजून घेणे महत्त्वाचे असते. पार्थ पवार हे या सर्व गोष्टी शिकून घेतील आणि नक्कीच चांगली कामगिरी करतील.





















































