एमटीएनएलच्या केबलचोरांना राजकीय वरदहस्त, पश्चिम उपनगरात खुलेआम चोरी; सुनील प्रभूंचा आरोप

मुंबईच्या पश्चिम उपनगरात जेसीबीच्या सहाय्याने एमटीएनएलच्या फिल्ड पॉवर केबलचोरीचे प्रमाण वाढले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, मागाठाणे, दहिसर येथे चोऱया होतात, पण चोर सापडले नाहीत. या टोळ्यांना राजकीय वरदहस्त आहे का, असा सवाल शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत विचारला.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सुनील प्रभू यांनी विदर्भाचा अनुशेष, ढासळती कायदा व सुव्यवस्था, गिरणी कामगार, शिवभोजन थाळी केंद्राचा निधी, मराठी शाळा पडण्याचा धोका अशा विविध विषयांवर सरकारला जाब विचारला.

शेतकऱ्यांच्या हाती भोपळा

शासनाने गाजावाजा करून कृषी समृद्धी योजना आणली, पण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांनी या योजनेला पाच हजार कोटी रुपये देण्याच्या घोषणा केल्या; पण पुरवणी योजनेत शून्य रक्कम आहे. या अधिवेशनात शेतकऱयांच्या हाती भोपळा दिला.

गिरणी कामगारांना मुंबईत घरे

गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मुंबईत जी घरे होतील त्यामध्ये गिरणी कामगारांना घरे द्यावीत. उपनगरात पोलिसांना घरे देण्याची योजना जाहीर केली. दहा हजार पोलिसांच्या घरांचे काय झाले?

600 शाळा बंद होण्याची भीती

मराठी शाळा बंद होत आहेत. मराठी शाळांना बळ देण्याऐवजी शिक्षण समायोजन योजना राबवली. 600 शाळा बंद पडण्याचा धोक आहे. त्यामुळे 25 हजारांहून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे.

अमली पदार्थांचे वाढते रॅकेट

अमली पदार्थांचे मोठे रॅकेट महाराष्ट्रात निर्माण होत आहे. अमली पदार्थांच्या व्यापाऱयात गुंतलेल्यांवर मकोका लावणार, पण तरीही यावर नियंत्रण मिळत नाही. विद्यार्थी अमली पदार्थांना बळी पडत आहेत. त्यांना सुधारण्यासाठी पुनर्वसन केंद्र कमी आहे. बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलींना विकण्याची मोठी टोळी महाराष्ट्रात काम करते आहे,