लाज नाही वाटत का? तुम्हाला आई वडील… सनी देओलने पपाराझींना फटकारले

suuny deol

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस मीडियावाल्यांनी अतिघाई करत त्यांच्या निधनाच्या बातम्या दिल्या. त्यावेळी देओल कुटुंबीय प्रसारमाध्यमांवर भडकले होते. बुधवारी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले. या दरम्यान पॅपाराझी हे कायम देओल कुटुंबियांच्या मागावरच होते. त्यामुळे वैतागलेल्या सनी देओल याने पॅपाराझींना फटकारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गुरुवारी धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल हा त्यांना भेटायला जात होता. त्यावेळी पॅपाराझी हे त्याचे फोटो काढत होते. यावेळी सनी देओल त्यांच्यावर भडकला. ”तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या घरी आई वडिल, मुलगा आहे ना. असे व्हिडीओ काढता ना तुम्हाला लाज नाही वाटत का?”, अशा शब्दात सनी देओलने पॅपाराझींना फटकारले.