सुपरस्टार मोहनलाल ड्रग्जविरोधात मोहीम सुरू करणार

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दोन सामाजिक उपक्रमांची घोषणा केल्या. यकृत प्रत्योरापण शस्त्रक्रियांना मदतीचा हात आणि ड्रग्जविरोधी मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केरळमधील अनेक मुले यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज आहे, असे मोहनलाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. 21 मे 1960 रोजी जन्मलेले मोहनलाल चार दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत आहेत. मल्याळम, तामीळ, तेलुगू, कन्नड या भाषांत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेय. पद्मभूषण सन्मान आणि पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला.