पैसे घेतले, पण घरे देण्यास टाळाटाळ, सुप्रीम कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्सच्या संचालक व पदाधिकाऱयांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळोजा येथील रोहींजण गावात उभ्या राहणाऱया गृहप्रकल्पात घरे देण्याचे आश्वासन देऊन सुप्रीम कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स या कंपनीने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीने घरासाठीचे पैसे घेऊन संबंधितांना घरेच दिली नाहीत. त्यामुळे सदर कंपनीविरोधात चेंबूर व तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुप्रीम कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्सचे ललित टेकचंदानी, काजल टेकचंदानी, अरुण मखीजानी, मनुल्ला कांचवाला, मिजा मोहम्मद नुरुल हसन इब्राहिम आणि कंपनीचे आजी-माजी संचालक व भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पैसे देऊनही घरे दिली जात नसल्याने हिरा जाधवानी (64) यांनी चेंबूर पोलिसांत तक्रार दिली होती.