स्त्रीधन फक्त स्त्रीचेच, कुणाचाच हक्क नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

स्त्रीधन ही फक्त महिलेची संपत्ती असते. महिलेच्या संमतीशिवाय तिचे वडील तिच्या सासरच्या मंडळींकडून स्त्रीधनाची वसुली करू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच गुन्हेगारी कारवाईचा उद्देश व्यक्तीला न्याय मिळवून देणे असून बदला घेणे हा उद्देश नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तेलंगणातील पडाला वीरभद्र राव नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींवर लग्नाच्या वेळी दिलेले स्त्रीधन (पैसे आणि मालमत्ता) परत न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीङ्गासमोर झाली. सुरुवातीला हे प्रकरण तेलंगणा हायकोर्टात होते. तेलंगणा हायकोर्टाने एफआयआर रद्द न केल्याने पहिल्या सासरच्या मंडळींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.