धरिले केशवा पाय तुझे…दर्शनासाठी आलेल्या सुप्रिया सुळेंना विठ्ठलाचे पाय सोडवेनात

1290

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी पंढरपुरात आल्या होत्या. त्यांनी यावेळी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेत असतेवेळी सुप्रिया सुळे यांची दृश्य टीपण्यात आली असून ती पाहिल्यानंतर विठ्ठलाच्या पायावर डोके टेकविल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बराच वेळ देवाचे पायच सोडले नाहीत असं या दृश्यात दिसून आले आहे. पदस्पर्श झाल्यानंतरही सुप्रिया सुळे बराच वेळ देवासमोर हात जोडून उभ्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाकडे काय साकडं घातलं असेल असा प्रश्न ही दृश्ये पाहणाऱ्या सगळ्यांना पडला आहे. खालील व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे यांनी जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घेतले त्यावेळची दृश्ये पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या