शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल! सुप्रिया सुळे यांचे मत

851
supriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वारसदार कोण याबाबत लोकसभा निवडणुकीपासून जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता, शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल. पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्तेच याबाबतचा कौल देतील. कुठलाही राजकीय पक्ष कुणा एका कुटुंबाची मत्तेदारी नाही असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत, वारसदार कुणीही होऊ शकतो असेही त्या म्हणाल्या.

बाळासाहेबांबद्दलचा अजित पवारांचा स्वतःचा अनुभव आहे
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादीची फार मोठी चूक होती, याबाबत विचारले असता अजित पवार नेहमी खरे बोलतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा त्यांचा एक अनुभव आहे. एका बैठकीत त्यांना तो अनुभव आला होता, असे सुळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या