बाहेरच्या लफड्यात आडव्या येणाऱ्या बायकोचा खून, नवऱ्याच्या साथीदारालाही अटक

सामना ऑनलाईन, नांदेड

नांदेडमधल्या गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या प्राचार्या सुरेखा राठोड यांची हत्या करण्यात आली होती. नांदेड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या हत्येप्रकरणी प्रमोद उर्फ अजय थोरात याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. थोरातला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी लिंबगाव येथून अटक केली. सुरेखा राठोड यांच्या नवऱ्याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा खून, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याविरूद्ध गुन्हा

विजय राठोड याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये आड येत असल्याने विजयने सुरेखा यांचा खून केला होता. सुरेखा यांचा खून करण्यात विजय राठोडची खास मैत्रीण आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तत्कालीन महिला तालुकाध्यक्ष वैशाली माने हिने देखील मदत केली होती. याशिवाय विजय राठोडचा मित्र प्रमोद उर्फ अजय थोरात,विजय राठोडचा भाऊ अशोक टोपा राठोड यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच वैशाली मानेसह प्रमोद थोरात व अशोक राठोड फरार झाले होते.

पोलिसाला न्यायालय परिसरात वकिलाची धक्काबुक्की

अटकेत असलेल्या विजय राठोड याने दोनवेळा पोलीस कोठडी मिळूनही काहीही माहिती दिली नव्हती. तपासात फारशी प्रगती होत नसल्याने सुरेखा राठोड यांच्या कुटुंबीयांनी हा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी करायला सुरूवात केली होती. यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. विजय राठोड याची खास मैत्रिण वैशाली माने ही दोन वेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाली आहे. तिला अटक झाल्यानंतर या प्रकरणातील बराचसा तपशील उघड होईल अशी आशा आहे, त्यामुळे पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.