आता हॉस्पिटलमधील उपचार आणखी महाग, शस्त्रक्रियेसाठी सर्ज प्राईसिंग नावाखाली होतेय लूट

यापुढे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे आणखी महाग होऊ शकते. कारण अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून सर्ज प्राईस म्हणजे पीक चार्ज घ्यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा हॉस्पिटलमध्ये जास्त रुग्ण असतील किंवा ऑपरेशन थिएटर व्यस्त असेल तेव्हा हे शुल्क घेण्यात येते.

सर्ज प्राईसिंगचा हा प्रकार अगदी विमान तिकीट खरेदी करण्यासारखा आहे. ज्या वेळी प्रवाशांची संख्या वाढते तेव्हा विमानाच्या तिकिटांच्या किमती वाढवल्या जातात. अगदी तसेच हॉस्पिटलमधील उपचारांचे झाले आहे. या परिणाम रुग्णांच्या खिशावर होत आहे. यासोबत विमा कंपन्यांसमोरही नवीन आव्हान उभे ठाकले आहे. ‘सर्ज प्राईसिंग’मुळे उपचाराचा खर्च सुमारे 20 टक्के वाढला आहे. एवढेच नव्हे तर लेप्रोस्कोपी/ हिस्टेरेक्टोमी यांवरही पीक चार्ज लागू झाला आहे. याशिवाय अनेक हॉस्पिटलनी आपल्या उपचार पद्धतीत बदल केला आहे. एंजियोग्राफ आणि स्टेस्टिंगसाठी वेगवेगळे शुल्क घ्यायला सुरुवात केलीय. त्यामुळे रुग्णांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आरोग्य किम्यासंदर्भातील एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, उपचारांचा खर्च दरकर्षी काढत आहे. यामध्ये महागाईचा दर सामान्य महागाईच्या दरापेक्षा 14 टक्के जास्त काढत आहे. त्यातच आता ह़ॉस्पिटलच्या नक्या नियमांमुळे उपचार आणखी महाग होणार आहे.

विमा कंपन्यांवर दबाव

वाढीव खर्चाचा भार विमा कंपन्यांवर पडू लागला आहे. पूर्वी विमा कंपन्या खर्चाचा अंदाज घेऊन एक पॅकेज तयार करायच्या मात्र आता हॉस्पिटलने सर्च चार्ज लावल्यामुळे उपचारांचा खर्च त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यामुळे आरोग्य विम्याचा प्रीमियमही वाढवला जाऊ शकतो. आधीच किमा कंपन्यांचे प्रीमियर महागले आहेत. कारण मोठय़ा प्रमाणात जीएसटी शुल्क आकारले जाते आहे. त्यात जर किमा कंपन्यांनी सर्ज प्राईज शुल्क आकारले तर खर्च आवाक्याबाहेर जाईल.