
लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सुव्रत जोशी लंडनमध्ये पत्नी सखी गोखले हिच्यासोबत वेळ घालवतोय. तिथूनच तो सोनी मराठी वाहिनीवरील ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ या मालिकेचे शूटिंग करतोय. नुकताच तो आवश्यक सामानाच्या खरेदीसाठी एका मॉलमध्ये गेला होता. तिथल्या एका चहा पावडरचे नाव चक्क ‘कोरोना’ असल्याचे वाचून त्याला चांगलाच धक्का बसला आहे.
चहा पावडरच्या पाकिटासोबत फोटो पोस्ट करत तो म्हणाला, ‘म्हणजे? काय? व्हॉट? कशासाठी? अर्थ काय? विनोद आहे की धंदा बुडावयाचा आहे? मजा आहे? चहा प्यायचा? प्यायला कोण येतंय? काय होतंय? याच्या वाफेनी काय होईल? ही चहापत्ती वापरून चहा विकला तर दुकानाचे नाव ‘अमृततुल्य’ असेल की ‘विषतुल्य’? हे चहाचे कप सॅनिटायझेरनी धुवावे लागतील का? का? का? कसे? हे आणि अनेक प्रश्न माझ्या मनात उकळत आहेत, कुणी गाळून देईल का?’ असे त्याने म्हटले आहे.



























































