तुमच्या मदतीमुळे सुयशला ऐकू येईल! कॉक्लिअर इम्प्लांटसाठी 12 लाखांचा खर्च

2

सामना ऑनलाईन, मुंबई

राजापूर तालुक्यातील सुयश बेडेकर या नऊ महिन्यांच्या बाळाला जन्मत:च  ऐकू येत नाही. सुयशला ऐकू येण्यासाठी त्याच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट बसवावे लागणार आहे. त्यासाठी तब्बल 12 लाख रुपये खर्च येणार आहे. हा खर्च बेडेकर कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुयशला तुमच्या मदतीची गरज आहे.

सुयश नऊ महिन्यांचा आहे. लहान मुले मोठय़ांच्या हाकेला, आवाजाला प्रतिसाद देतात, मात्र सुयश असे काही करत नव्हता. त्यामुळे त्याचे वडील गुरुप्रसाद बेडेकर यांनी त्याला केईएम रुग्णालयात आणले. सुयशच्या काही चाचण्या करून घेतल्या. या चाचण्यांत सुयशला Bilateral Profound SNHLआजार असल्याचे निदान झाले. त्यामुळेच त्याला ऐकू येत नाही. ऐकू येत नसल्याने तो बोलू शकणार नाही. सुयशवर त्वरित कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्र्ाक्रिया झाली तर तो ऐकू-बोलू शकेल.

बेडेकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.  पैसे जमा झाल्यानंतरच सुयशवर शस्त्र्ाक्रिया होणार आहे. केईएमच्या रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. हेतल मारफाटिया शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यानंतर सुयशला तीन वर्षे स्पीच थेरपी दिली जाणार आहे.

कशी कराल मदत?

सुयश बेडेकर या बाळावर वेळीच कॉक्लिअर इम्प्लांट झाले तर तो ऐकू-बोलू लागेल. त्याला आर्थिक मदत करण्यासाठी  ‘Dean PBCF KEM Hospital’ या नावाने धनादेश काढावा.

अधिक माहितीसाठी संपर्क 9834811957