
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यातील मोरे गावातील स्वाभिमान पक्षाचे माजी उपसरपंच अंकुश धुरी यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. वैभव नाईक हे नेहमी जनतेच्या संपर्कात असतात त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहे. विकास कामाचाही धडाका त्यांनी कायम ठेवला आहे. मोरे गावच्या सर्वागीण विकासासाठी वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून आपण शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे अंकुश धुरी यांनी यावेळी सांगितले. आमदार वैभव नाईक यांनी सर्वांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
मोरे गावातील प्रमुख रस्त्यासाठी 4.5 कोटींचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आपण मंजूर केला आहे. गावात स्ट्रीट लाईट , धनगरवाडी कॉजवे , गोसावीवाडी रस्ता तसेच विभागात अनेक विकासकामे करण्यात आली असून मोरे गावातील जी प्रलंबित विकास कामे आहेत ती येत्या काळात आपण पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी गावचे उपसरपंच कृष्णा धुरी, विभाग प्रमुख रामा धुरी, शाखा प्रमुख प्रकाश सावंत, प्रशांत म्हाडगूत, बापू डोईफोडे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























































